
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी २२ जूनला पुण्यातून दिवेघाट मार्गे सासवडकडे प्रस्थान करणार आहे. दिवेघाटात रस्ता रूंदीकरणाचे काम चालू आहे. अपघाताचा धोका लक्षात घेत नागरिकांना डोंगरमाथ्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रवेशबंदीचे उल्लंघन केल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ नुसार कारवाई करण्याचे आदेश पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.