
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून २२ जून या दिवशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून १ सहस्र ते दीड सहस्र स्वयंसेवक येणार आहेत, तसेच सोलापूर जिल्ह्यामधून विविध ठिकाणचे अधिकारी, कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतील. यांसाठी जवळपास २० ते २२ पथके आम्ही सिद्ध करणार आहोत. प्रत्येक पथकामध्ये ४० ते ५० लोक, तसेच स्वयंसेवक आणि अधिकारी, कर्मचारी रहातील. प्रत्येक पथकाला विभाग वाटून देऊन त्यांना त्या विभागाची स्वच्छता करून घेण्याचे दायित्व त्या पथकाचे राहील, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.