हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही ! – गजानन काळे, प्रवक्ते, मनसे

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे पत्रकारांशी बोलतांना

नवी मुंबई – महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. महाराष्ट्र शासनाने नुकताच काढलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांनी त्रिभाषा सूत्र राबवायचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. मनसेचे राज ठाकरे यांचा या धोरणाला विरोध आहे. त्या संदर्भातील त्यांचे पत्र महाराष्ट्रातील सर्व शाळांना देण्यात येणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मनसेने  वाशीमधील शाळांना हे पत्र दिले. या वेळी मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.