रस्ते, रेल्वे, विमानतळ आदी कोणताही प्रकल्प रखडणार नाही, याची दक्षता घेण्याचीही सूचना

मुंबई – प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गासह राज्यातील रस्ते, रेल्वे, विमानतळ आदी महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत, तसेच भूसंपादनाच्या अभावी एकही प्रकल्प रखडणार नाही, याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा १९ जूनला मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतला. या वेळी त्यांनी या सूचना दिल्या.