अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारांचे प्रकरण
बळजोरीने गर्भपात करायला भाग पाडल्याने आरोपीची आईही अटकेत !

ठाणे, २० जून (वार्ता.) – येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणी पाचपाखाडी येथे रहाणार्या आकाश हटकर (वय २८ वर्षे) याला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत घडली होती. यानंतर आरोपी आणि त्याची आई रेखा हटकर (वय ४८ वर्षे) यांनी तिला बळजोरीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी मुलीने नौपाडा पोलीस ठाणे येथे आरोपी आकाश हटकर आणि रेखा हटकर यांच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. (अशांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक)