शाळांनी पालक-विद्यार्थी यांच्यावर ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्याची सक्ती करू नये !’

सुराज्य अभियानाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन !

माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती छाया महिंद्रकर यांना निवेदन देतांना (डावीकडून) श्री. विवेक कद्रीवेल आणि श्री. मनोहर उणेचा

पुणे, २० जून (वार्ता.) – ‘नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतांना शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक-विद्यार्थी यांना ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, तसेच असे काही होतांना आढळल्यास त्या शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती छाया महिंद्रकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे यांना देण्यात आले. दोन्ही शिक्षणाधिकार्‍यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ‘या संदर्भात परिपत्रक काढून शाळांना सूचना देऊ’, असे सांगितले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोहर उणेचा, श्री. सुरेंद्र महाजन, श्री. विवेक कद्रीवेल हे उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे यांना निवेदन देतांना (डावीकडून) सर्वश्री विवेक कद्रिवेल, मनोहर उणेचा आणि सुरेंद्र महाजन

संपादकीय भूमिका

  • असे निवेदन का द्यावे लागते ?
  • प्रशासनाला ते लक्षात आले पाहिजे !