विरार लोकलगाडीत जागेवरून दोन महिलांची एकमेकांना मारहाण !

डोके फुटून एक महिला रक्तबंबाळ

मुंबई – विरार लोकलगाडीत दोन महिलांनी एकमेकांना मारहाण केली. यात एका महिलेचे डोके फुटून ती रक्तबंबाळ झाली. जागेवरून हा वाद झाला होता. सायंकाळी ७.३० वाजता ही घटना मीरारोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान घडली.

प्रवाशांनी या घटनेचे भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण केले. भाईंदर रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना खाली उतरवले. या संदर्भात कुणीही तक्रार प्रविष्ट न केल्याने गुन्हा नोंदवण्यात आला नाही.

संपादकीय भूमिका

‘महिला-पुरुष समानतेसाठी आग्रही असणार्‍या महिला आता मारहाणीतही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत’, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?