१६ वर्षांच्या मुलीचे पलायन !
वाशिम – येथील दिशा मुलींच्या निरीक्षणगृहाच्या १२ फूट उंच भिंतीवरून १६ वर्षीय मुलीने उडी मारून पळ काढला. तिचा शोध चालू आहे. (बाल संरक्षण यंत्रणेची ऐशीतैशी ! – संपादक)
सध्याच्या पिढीत संयम नसल्याचे दर्शवणारी घटना ! वडील रागावल्याने मुलीची आत्महत्या !
जळगाव – दिवसभर घरात नसलेली मुलगी रात्री ८ वाजता घरी आल्यावर वडिलांनी तिला जाब विचारला. याचा राग आल्याने तिने जवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसर्या दिवशी तिचा मृतदेह विहिरीत तरंगतांना दिसला.
बांगलादेशी महिलेकडे १५ आधारकार्ड !
पनवेल – खारघर शहरातील बेलापाडा आदिवासी भागात १ बांगलादेशी महिला रहात असल्याची तक्रार करण्यात आली होती. तिच्याकडून १५ आधारकार्ड कह्यात घेतली आहेत. येथे आणखीही बांगलादेशी नागरिक रहात असल्याचे समजते.
संपादकीय भूमिका : अशा बांगलादेशींना त्यांच्या देशात हाकलून द्यायला हवे !
मुंब्रा लोकल दुर्घटनेतील अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू !
ठाणे – मुंब्रा रेल्वेस्थानकाच्या जवळ लोकलगाडीमधून १४ जण खाली पडले. यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला होता. ज्युपिटर रुग्णालयात उपचार चालू असलेले अनिल मोरे यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांची संख्या आता ५ झाली आहे.