|

ठाणे, २० जून (वार्ता.) – येथील हाजुरी परिसरात बकरी ईदच्या दुसर्या दिवशी कचर्यामध्ये गोवंशाचे शिर आढळले होते. या घटनेला ८ हून अधिक दिवस उलटून गेले. याविषयी हिंदुत्वनिष्ठ माहिती घेण्यास वागळे इस्टेट पोलीस ठाणे येथे गेले असता ‘या प्रकरणी एकाला कह्यात घेतले असून अन्वेषण चालू आहे’, तसेच या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने आरोपीला शोधण्यात मर्यादा येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘हिंदूंच्या संदर्भात एखादी घटना घडल्यास त्याचवेळी सीसीटीव्ही कॅमेरा बंद कसा होतो ?’, असा प्रश्न हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थित केला. ‘या प्रकरणी हिंदूंना न्याय न मिळाल्यास ठाणे महानगरपालिका आणि विधानसभेच्या बाहेर तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ विजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
१. ‘राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना असे कृत्य होत आहे. आरोपींना शोधण्यात चालढकलपणा होत असेल, तर येत्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला जाईल’, असे सकल हिंदु समाजाने सांगितले.
२. महिलांची छेड काढणे असो, हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड असो, तसेच गोवंश हत्या करून मस्तक कचर्यात टाकल्याचे प्रकरण असो, या तीनही घटनांच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे होतात ? या घटनेच्या आधी परिसरातून एका मुसलमानाची दुचाकी चोरीला जाते, ती सीसीटीव्ही कॅमेर्याच्या चित्रीकरणाच्या साहाय्याने शोधली जाते. हे असे का ?
३. ‘येथील समाजकंटकांना कायद्याची भीती वाटत नसल्यानेच बकरी ईदच्या दिवशी गोवंशहत्या करून मस्तक कचर्यात टाकले. पोलीस जरी ‘आम्ही एका व्यक्तीला कह्यात घेतले आहे’, असे सांगत असले, तरी हिंदु समाजाला ही कारवाई मान्य नाही. आरोपीला जामीन मिळू नये, तसेच गोवंशाचे मांस खाणारे सर्व जण तितकेच दोषी आहेत. त्यांना या प्रकरणात आरोपी केले पाहिजे, अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे’, असे विजय त्रिपाठी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|