Asim Munir With Trump : पाक सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमवेत भोजनाचे आमंत्रण

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात भेट होणार आहे. ते एकत्र भोजन करणार आहेत. यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा संदर्भ देत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, मुनीर ही तीच व्यक्ती आहे, जिच्या प्रक्षोभक, आग लावणार्‍या आणि चिथावणीखोर वक्तव्यांमुळे पहलगाममध्ये आतंकवादी आक्रमण झाले. आज तोच मुनीर व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमवेत भोजन ग्रहण करणार आहे.

अमेरिकेतील पाकिस्तान्यांकडून मुनीर यांच्यावर टीका

दुसरीकडे अमेरिकेत रहाणार्‍या काही पाकिस्तानी आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाच्या समर्थकांनीच या भेटीवरून मुनीर यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मुनीर यांना चापलूस, खुनी, हुकूमशाह म्हटले. तत्पूर्वी त्यांनी मुनीर यांच्याविरुद्ध निदर्शने करत घोषणाबाजी केली आणि त्यांना ‘सामूहिक हत्यारा’ संबोधले.

संपादकीय भूमिका

अमेरिका भारताचा विश्‍वासघातकी मित्र देश आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. ज्या मुनीर यांनी पहलगाम येथील आक्रमणाचा कट रचला, त्यांना अमेरिका इतके महत्त्व देऊन भारताच्या जखमेवर मीठ चोळत आहे. भारताने याचा तीव्र निषेध करणे आवश्यक आहे !