Jamnagar Bathtubs In Mosque : जामनगर (गुजरात) : अवैध दर्ग्यात आढळले आलीशान ‘बाथटब’ आणि संगमरवराच्या खोल्या !

११ सहस्र चौरस फूट जागेत बांधण्यात आला दर्गा !

जामनगर (गुजरात) – येथे अवैध बांधकामांवर ऐतिहासिक कारवाई करण्यात येत आहे. यांत ३०० हून अधिक घरे, तसेच ७-८ इस्लामी वास्तू यांचाही समावेश आहे. अशात जामनगर पोलिसांना एका अवैध दर्ग्यामध्ये संगमरवराने उभारण्यात आलेल्या खोल्या, तसेच आलीशान ‘बाथटब’ (आंघोळीसाठी केलेले हौद सदृश्य बांधकाम) आढळले.


जामनगरचे पोलीस आयुक्त प्रेमसुख डेलू यांनी माहिती दिली की, या परिसरात ७ लाख चौरस फूट भूमीवर अवैध इस्लामी वास्तू बांधण्यात आल्या असून या भूमीचे मूल्य १९३ कोटी ५७ लाख रुपये आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून या वास्तूंनी सरकारी भूमीवर अवैधपणे नियंत्रण मिळवले होते. आयुक्त पुढे म्हणाले की, आलीशान खोल्या असलेला दर्गा अतिशय भव्य पद्धतीने बांधण्यात आला आहे. येथे राजवाड्यांसारखे बाथटब सापडले. तब्बल ११ सहस्र चौरस फूट जागेत हा दर्गा बांधण्यात आला असून दर्ग्याला परकीय निधी मिळाल्याचा संशयही वाढत आहे. ‘कोणत्याही प्रकारचे पैसे स्वीकारले जाणार नाहीत’, अशी पाटी लावण्यात आली आहे. दर्ग्याचा चौकीदार पसार आहे.

संपादकीय भूमिका

अनेक दर्गे, मशिदी, मदरसे हे समाजविघातक कृत्यांचे अड्डे बनल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आता त्यांच्या ऐश्वर्याचे हे ओंगळवाणे रूप जिहादला मिळणार्‍या आर्थिक पाठबळाचेच उदाहरण आहे, असे म्हणता येईल !