|

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील अहमदगंजमध्ये रहाणार्या यासीन नावाच्या मुसलमान तरुणाने सामाजिक माध्यमाद्वारे भगवान श्रीराम यांच्याविषयी अश्लील विधान केल्यानंतर संतप्त झालेले बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांचे कार्यकर्ते यासीनच्या घरी पोचले. त्यांनी यासीनला पकडून स्थानिक मंदिरात नेले. तेथे यासीनच्या कपाळावर टिळा लावण्यात आला आणि त्याला क्षमा मागण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
विहिंप आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते यासीनच्या घरी गेल्यावर तो मंदिरात येण्यास नकार देऊ लागला. त्याच्याकडे चाकू होता आणि त्याने एका कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. तेव्हा कार्यकर्त्यांनी त्याला घरातच चोपले. त्यानंतर तो आणि त्याची पत्नी नगमा मंदिरात येण्यास सिद्ध झाले. मंदिरात यासीन याने देवाच्या मूर्तीसमोर पुन्हा अशी चूक न करण्याचे वचन दिले आणि सर्वांची क्षमाही मागितली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
संपादकीय भूमिकाअशी क्षमा मागून पुरेसे नाही, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. पाकमध्ये महंमद पैगंबर, कुराण आणि इस्लाम यांचा अवमान करणार्यांना थेट फाशी दिली जाते, तशीच शिक्षा आता भारतातही हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांना झाली पाहिजे ! |