१ महिन्यापूर्वी केलेल्या छेडछाडीचा गुन्हा नोंद असूनही आरोपींवर कारवाई नाही, मुलीच्या आत्महत्येनंतर आरोपींना अटक
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे एका १७ वर्षीय मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. महिन्याभरापूर्वी या मुलीची छेड काढण्यात आली होती. या प्रकरणी आमिर, सुहेल, शोएब आणि साकिब यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला होता; मात्र कारवाई करण्यात आली नाही. यामुळे कंटाळून १७ जूनला या अल्पवयीन पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी चौघांना अटक केली.
पीडिता तिच्या दोन बहिणींसह घरात होती. बहिणी घराच्या छतावर असतांना पीडितेने पंख्याला गळफास लावून घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे या दिवशी चौघा आरोपींनी पीडितेला आईचा अपघात झाल्याचे भासवून बोलावले होते आणि दूरच्या एका गोदामात नेऊन तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी आरोपींवर सौम्य कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला, तसेच कुठलीही कारवाई केली नाही. आरोपींनी मुलीच्या कुटुंबियांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला होता.
संपादकीय भूमिका
|