Love Jihad By Congress : इंदूरमध्ये (मध्यप्रदेश) ‘लव्ह जिहाद’साठी मुसलमान तरुणांना पैसे देणारा काँग्रेसचा नगरसेवक अन्वर कादरी पसार !

काँग्रेसचा नगरसेवक अन्वर कादरी उपाख्य डकैत (दरोडेखोर)

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे लव्ह जिहादच्या प्रकरणात मुसलमान तरुणांना पैसे देणार्‍या काँग्रेसचा नगरसेवक अन्वर कादरी उपाख्य डकैत (दरोडेखोर) याचा पोलीस शोध घेत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून तो पसार आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर आणि नातेवाइकांच्या ठिकाणीही धाडी घातल्या; पण तो सापडला नाही. या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. अन्वर याचा भाऊ अज्जू डकैत आणि फिरोज यांच्याविरुद्धही अनेक गुन्हेगारी गुन्हे नोंद आहेत. अज्जू हत्या आणि दरोडा प्रकरणात कारागृहात आहे.

नगरसेवक अन्वर याने हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी साहिल आणि त्याचा मित्र अफझल यांना पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर साहिल आणि अफझल यांनी सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु तरुणींशी मैत्री करून त्यांना जाळ्यात अडकवले. या दोघांना अटक करण्यात आल्यावर त्यांनी नगरसेवक अन्वर कादरी याचे नाव सांगितले. त्यांनी नगरसेवक अन्वर कादरी याने आम्हाला हिंदु तरुणींशी विवाह करून तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले.


साहिल खान याच्यावर १८ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. साहिलने अनुमाने ५ महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर स्वतःची हिंदु ओळख सांगून एका हिंदु मुलीशी मैत्री केली होती. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तो मुसलमान असल्याचे सांगितले, तसेच या तरुणीला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला.

संपादकीय भूमिका

  • अशा काँग्रेस पक्षावर बंदी घालण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली पाहिजे !
  • ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे म्हणणारे काँग्रेसचे हिंदू नेते आता गप्प का ?