Mumbai Police – Cyber Predator Caught : कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे शेकडो मुलींचा छळ करणार्‍या आरोपीला अटक !

आरोपीच्या भ्रमणभाषमध्ये तरुणींची १३ सहस्र छायाचित्रे आढळली !

कर्नाटकातील यशवंतपूर येथे १३ सहस्र ५०० महिलांचे फोटो पोस्ट करणाऱ्या सायबर गुन्हेगार शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग याला मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई : मुलींचा छळ करणार्‍या, तसेच स्वतःच्या विकृती मागण्या मुलींनी मान्य न केल्यास कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) वापर करून त्यांची काढलेली अश्लील बनावट छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून त्यांची अपकीर्ती करणार्‍या शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या भ्रमणभाषमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून त्याने १३ सहस्र ५०० छायाचित्रे सिद्ध केलेली आढळली.

सायबर गुन्हेगार शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग

१. इन्स्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणाकडून अश्लील छायाचित्रांच्या आधारे भावनिक ‘ब्लॅकमेलिंग’ होत असल्याची तक्रार एका तरुणीने दहिसर पोलिसांकडे केली होती.

२. आरोपी तरुणीशी मैत्री केल्यानंतर तिला विनाकपड्यात व्हिडिओद्वारे संपर्क करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणायचा. तिने नकार दिल्यानंतर त्याने कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून तिची अश्लील छायाचित्रे सिद्ध केली आणि इन्स्टाग्रामवरील बनावट पृष्ठावरून प्रसारित केली.

संपादकीय भूमिका

तरुणींनी सामाजिक माध्यमांवर स्वतःची वैयक्तिक माहिती आणि छायाचित्रे प्रसारित करतांना सतर्कता बाळगणे किती आवश्यक आहे ?, हे या घटनेवरून लक्षात येते !