सातारा, १७ जून (वार्ता.) – ३२ वर्षांनंतर सातारा येथे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ पार पडणार आहे. हे संमेलन सातारा येथे व्हावे, यासाठी मंत्री भोसले यांनी सलग १२ वर्षे पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला आहे, तसेच मराठी भाषेसाठी केलेल्या अन्य कार्यामुळे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली. ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ शाखा सातारा आणि ‘मावळा फाऊंडेशन’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी कुलकर्णी म्हणाले,
१. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साहित्य चळवळीला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला आहे.
२. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांना १ लाख पत्रे पाठवण्याच्या मोहिमेचा शुभारंभही भोसले यांच्या हस्ते झाला होता, तसेच देहली येथे जाऊन आंदोलन करणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आहेत.
३. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्यसंमेलन यशस्वी करण्यात मंत्री भोसले यांनी मोलाची भूमिका ठोठावली आहे.
![]() शताब्दीपूर्व होणारे हे साहित्य संमेलन आपण सर्वांनी मिळून अतिशय देखणे आणि दिमाखदारपणे पार पाडूया. अभिजात मराठी भाषेच्या उत्सवासाठी देश-विदेशातील समस्त मराठी बांधवांना मी सातारा येथे येण्याचे निमंत्रण देतो. आम्ही सर्वांचे स्वागत करतो. |