उरण : हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यावर ४ धर्मांध मुसलमानांनी केले प्राणघातक आक्रमण !

  • गोवंशियांच्या हत्येचा व्हिडिओ प्रसारित केल्यावरून राग

  • गाय आणि म्हैस यांना कापणार असल्याची धमकी

धर्मांधांच्या प्राणघातक आक्रमणात जखमी झालेले हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते प्रेमसिंह यादव

उरण (जिल्हा रायगड) – येथील जासई गावातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते प्रेमसिंह यादव (वय ३० वर्षे) यांच्यावर मुसलमानांनी चाकू आणि लोखंडी रॉड यांनी प्राणघातक आक्रमण केले. यात त्यांच्या हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत. आक्रमण करून परततांना आक्रमणकार्‍यांनी धमकी दिली, ‘‘आम्ही गाय आणि म्हैस यांनाही कापू ! बघू विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल काय करतात ते !’’

प्रेमसिंह यांनी ४ दिवसांपूर्वी जासई येथील महाराष्ट्र ढाबा येथे गोवंशियांच्या हत्या होत असल्याचा आरोप करत त्याचे व्हिडिओ प्रसारित केले होते. या पार्श्‍वभूमीवर हे आक्रमण केल्याचे समजते. या ढाब्याचा मालक मुसलमान असून तेथे काम करणार्‍या मुसलमान कर्मचार्‍यांनी हे आक्रमण केले. आक्रमणकर्ते दोन दुचाकींवरून आले होते. त्यांच्या दुचाकींना क्रमांकाची पाटी (नंबर प्लेट) नव्हती.

प्रेमसिंह रात्री १ वाजता घरी परतत असतांना हे आक्रमण झाले. प्रसंगावधान राखत त्यांनी तेथून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सरकारी रुग्णालयात नेले; पण तेथे ते बेशुद्ध पडले. त्यामुळे त्याला वाशी येथील रुग्णालयात हालवण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • केवळ व्हिडिओ प्रसारित केल्यावर आक्रमण होते, याचा अर्थ गोवंशियांचे रक्षण करणे हिंदुत्वनिष्ठांसाठी किती जोखमीचे झाले आहे, याची कल्पना येते. गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात अस्तित्वात आहे कि नाही, असाही प्रश्‍न यातून निर्माण झाला आहे !
  • गोवंशियांच्या सुरक्षेसाठी धडपडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना प्रशासनाने संरक्षण पुरवायला हवे !