विमानात धोकादायक वस्तू आढळली नाही
नागपूर – कोचीहून देहलीकडे जाणार्या इंडिगोच्या विमानात बाँब ठेवल्याची सूचना मिळाली. त्यानंतर हे विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. नागपूर पोलीस आणि अग्नीशमन दल यांच्याकडून विमानाची पडताळणी करण्यात आली. या प्रकारामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्ष पहाणीअंती विमानात कोणतीही धोकादायक वस्तू आढळली नाही. हे विमान सकाळी ९.२० वाजता कोचीहून निघाले होते आणि दुपारी १२.३५ वाजता देहलीत उतरणार होते.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे विमान अथवा अन्य ठिकाणी बाँब ठेवल्याच्या धमक्या सातत्याने येत आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकरणात कुणास अटक झाली, तर त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! |