
मुंबई, १७ जून (वार्ता.) – भाजपमध्ये येण्यासाठी वर्ष २०१४-२०१९ या कालावधीत शरद पवार यांनी अनेकदा चर्चा केली. एवढेच नव्हे, तर कोणती खाती हवी आहेत, येथपर्यंत शरद पवार यांनी चर्चा केली होती, असा गौप्यस्फोट राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी १७ जून या दिवशी पत्रकार परिषदेत केला. अजित पवार यांच्या भाजपसमवेत सत्ता स्थापनेविषयी शरद पवार यांनी केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आशिष शेलार यांनी वरील वक्तव्य केले.