संपादकीय : गोवंश हत्येची समस्या !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील लखीपूर येथे मुसलमानांनी कालीमाता मंदिराजवळ गोमातेचे मुंडके ठेवल्याच्या घटनेनंतर ५ मुसलमानांना अटक करण्यात आली. नुकतीच तेथील धुबरीमध्येही अशीच घटना घडल्यावर तेथील मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी मंदिरासमोर कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्यांना दिसता क्षणी थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले. यावरून त्यांची समस्या मुळाशी जाऊन नष्ट करण्याची तळमळ लक्षात येते. यावर मुसलमानांच्या धार्मिक प्रतिनिधींनी केलेल्या टीकेलाही त्यांनी भीक घातली नाही. प्रत्यक्षात पाहिले, तर धुबरी येथील ज्या हनुमान मंदिरासमोर गोमांस फेकल्याने तणाव निर्माण झाला होता, ते मंदिर पुष्कळ जुने आहे; परंतु अत्यंत छोटेसे (म्हणजे जेमतेम ७ चौरस फुटांचे) आहे आणि आजूबाजूलाही विशेष काही नसून वनसदृश भाग आहे. त्यामुळे या घटनेकडे ते सहज दुर्लक्ष करू शकले असते; परंतु सरमा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर प्रत्यक्षात ते स्वतः तिथे गेले आणि ‘मंदिर मोठे करण्यासाठी साहाय्य देतो, मंदिर मोठे करा’, असेही सांगून आले. त्यांच्या या कृतीमुळे हिंदूंना किती आपलेपणा वाटला असेल, हे वेगळे सांगायला नको. एखाद्या आदर्श राजाला शोभेसे कृत्य त्यांनी केले. गोमांस फेकण्यामागे हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचे षड्यंत्र असल्याच्या तक्रारीची त्यांनी नोंद घेतली आणि दूरचा विचार करून कठोर निर्णय घेतला. सरमा यांनी घेतलेला कठोर निर्णय हा त्यांना खरोखरच समस्या नष्ट करण्याची तीव्र इच्छा आणि तळमळ दर्शवतो. त्यांनी आसाममध्ये हॉटेल, उपाहारगृह आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे आसाममधील बहुसंख्य लोकांच्या भोजनाचा हा भाग असूनही ही बंदी घालण्यात आली आहे. त्यावर काँग्रेसने यथेच्छ टीका आणि विरोधही केला. सरमा यांच्या वरील कृतीतून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. केवळ गोरक्षणासाठी गोपालनाचे वरवरचे उपाय करून ते थांबत नाहीत, तर जशी कर्करोगाची गाठ मुळासह उपटून काढण्यासाठी कठीण वाटणारी शस्त्रक्रिया करण्याची सिद्धता ठेवतात, ती गाठ परत उद्भवू नये म्हणून जशी ‘केमोथेरपी’ (कर्करोगाच्या या उपचारात रोगाची लागण झालेल्या पेशी नष्ट केल्या जातात.) आवश्यक असते, तशी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याचीही कार्यवाही करतात. धुबरीच्या घटनेतही त्यांनी गुन्हेगारांना शोधून कठोर शिक्षा होईल, असे पाहिले आहे. यावरून लक्षात येते ‘केवळ शेजारी मोठी रेष आखण्यावर त्यांचा विश्वास नाही, तर लहान रेष समूळ नष्ट करणे, हाही पर्याय ते वापरत आहेत.’ सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अनुकरण करणे अपेक्षित आहे.

गोहत्या कधी थांबणार ?

बकरी ईद आली की, खरेतर देशभरातील गोप्रेमी हिंदूंना धडकीच भरते. बकरी ईदनंतर काही दिवस गोमातेच्या क्रूर हत्यांची वृत्ते कुठे ना कुठे वाचायला मिळतात. या वेळीही म्हणजे ७ जून २०२५ या दिवशी महाराष्ट्र शासनाने कुठेही दंगलसदृश वातावरण निर्माण होऊ नये; म्हणून बंदोबस्त ठेवला होता. ही स्थिती बहुतांश वेळा गोहत्यांमुळे निर्माण होते, हे लक्षात घेतले पाहिजे. बकरी ईदच्या आधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरंभीच्या कर्मभूमीत, म्हणजे नागपूर येथेच तब्बल २७८ गोवंशियांची कसायांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. विसापूर (दापोली) येथे २९ गोवंशीय आणि अहिल्यानगर येथे एका ठिकाणी ६४ गोवंशियांची सुटका करण्यात आली आणि अन्य एका ठिकाणी ५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. नवी मुंबईत कचर्‍याच्या ढिगार्‍यात गायीचे तुकडे आढळले. गोपालक श्रीकृष्णाच्या मथुरेत गोमातेचे तुकडे रस्त्याच्या कडेला लटकवले होते; त्यानंतर तेथे ५० मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यात आला. या केवळ प्रातिनिधिक घटना आहेत. हे सगळे भयंकर आहे. जशा देशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या ४ तरी घटना घडतात, तशी प्रतिदिन राज्यात कुठे ना कुठे गोवंशियांची तस्करी किंवा हत्या यांविषयीची घटना घडलेली असते. सर्व यंत्रणा हाताशी असतांना प्रशासनाला गोवंश हत्या थांबवता न येणे, हे घोर अपयशच आहे.

गोप्रेमींना आवाज का उठवावा लागतो ?

काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराने टोक गाठले होते. निधर्मी विचारसरणीमुळे शासनासह संपूर्ण प्रशासनही हिंदूंच्या संदर्भातील सर्व सूत्रांना अगदी दाबून टाकत होते. गोहत्यारांच्या बाजूने उभे राहून गोरक्षकांचा अंत पहात होते; परंतु आता राजकीय भाषेतच बोलायचे झाले, तर महाराष्ट्रात ‘डबल इंजिन’चे (केंद्र आणि राज्य दोन्हीकडे) हिंदुत्वनिष्ठ शासन आहे. त्यामुळे प्रशासनाने गोहत्यार्‍यांवर १०० टक्के कडक कारवाई करायला, त्यांच्या विरोधात पुरावे उभे करायला आणि त्यांना कायद्याचे संरक्षण मिळू शकणार नाही, हे पाहून कठोर शिक्षा होईपर्यंत कष्ट घ्यायला काहीच हरकत नसावी. ईदच्या पार्श्वभूमीवर वरीलप्रमाणे देशात सर्वत्र मुसलमानांकडून गोहत्या होतात; म्हणून गोसेवा समितीने शासनाला ईदच्या काळात पशूबाजार बंद ठेवण्याचे पत्र दिले होते; परंतु शासनाकडून ते फेटाळण्यात आले. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्री जिथे प्रशासनाकडून पशूवधगृहाला अनुमती दिली जाते आणि ते होऊ नये; म्हणून कित्येकांचे त्याविषयी काही बोलण्याचे धैर्यही होत नाही. हिंदुत्वनिष्ठांना तिथे जाऊन याविरोधात आवाज उठवावा लागतो. अन्यही ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांना अवैध पशूवधगृहाच्या विरोधात न्यायालयीन लढे द्यावे लागत आहेत.

नक्षलवादाप्रमाणे गोहत्यांचा प्रश्नही कायमस्वरूपी निकाली काढा !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस २२ जुलै या दिवशी ‘गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा होणार’, असे घोषित केले. ही गोष्ट खचितच स्वागतार्ह आहे. ‘व्यवस्थापकीय मुख्यमंत्री’ या निमित्ताने गोवंश जतन आणि संवर्धन यांच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून ते निश्चित काही योजनांचे नियोजन करतील आणि त्या कार्यान्वित करण्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्नही करतील, याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही; परंतु केवळ गोरक्षणाच्या प्रयत्नांनी गोहत्यारे त्यांच्या कारवाया थांबवणार नाहीत. नक्षलवादाप्रमाणे गोहत्यांचा प्रश्नही कायमस्वरूपी निकाली लावायला हवा. आता पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती पालटली आहे; गोतस्कर मोठ्या प्रमाणात पकडले जात आहेत, तरीही ‘गोवंशियांची तस्करी कुठे चालू आहे ?’, हे गोरक्षकांना समजते; पण निष्क्रीय पोलिसांना समजत नाही, हे अत्यंत लज्जास्पद आहे. गोरक्षक कायमच जिवावर उदार होऊन गोरक्षण करत असतात; परंतु आणखी किती दिवस त्यांनी हे करत रहायचे आहे ? लक्षावधी वर्षे गोमातेच्या जिवावर ‘सुजलाम् सुफलाम्’ असणार्‍या भारताला पुन्हा एकदा खर्‍या समृद्धीकडे न्यायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायनीती आणि दंडपद्धत तत्परतेने अन् कठोरपणे अवलंबायला हवी, असेच हिंदूंना वाटते !

गोवंश हत्येचा प्रश्न पूर्णपणे निकाली काढण्यासाठी नक्षलवादाप्रमाणे ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबायला हवे !