थोडक्यात महत्त्वाचे ! ( दि. १८ जून २०२५ )

जळगाव येथे तलवार घेऊन दहशत माजवणार्‍यावर गुन्हा ! 

जळगाव – येथील परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या शेख आफताब शेख कलीम (वय १९ वर्षे) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. येथील खदाणी परिसरात तो तलवार घेऊन फिरत होता. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका – धर्मांध उघडपणे दहशत माजवतात, याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरलेला नाही !


कोनगाव (पनवेल) येथे ७ बांगलादेशी नागरिक कह्यात !

• बांगलादेशींचा सुळसुळाट झालेले पनवेल !

• ४ महिला आणि ३ मुले यांचा समावेश

पनवेल – येथील पोलिसांनी कोनगाव परिसरातून ७ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले. त्यात ४ महिला आणि ३ मुले यांचा समावेश आहे. येथील पोलिसांची बांगलादेशी घुसखोरींच्या विरोधात प्रतिदिन कारवाई चालू आहे.


नदीकाठच्या लोकांना सतर्कतेची चेतावणी

कोल्हापूर – ३ दिवसांच्या अंतराने जिल्ह्यात १७ जूनला मुसळधार पाऊस पडला. पावसाची गती वाढत असल्यामुळे राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाणीपातळी वाढण्याच्या भीतीने राधानगरी धरण, तसेच पंचगंगा, भोगावती, कुंभी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.


यंदा पालखीवर ‘एआय’ ठेवणार लक्ष !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी उत्सवात गर्दीच्या नियोजनासाठी पुणे पोलिसांनी ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकर्‍यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत.


‘माझी लाडकी बहीण योजने’वर चित्रपट !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १७ जून (वार्ता.) – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेवर मराठी चित्रपट येणार आहे. योजनेचे वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर हा चित्रपट मांडला जाणार आहे. सातारा येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.