सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांचा संतप्त प्रश्न

सातारा, १७ जून (वार्ता.) – येथील संगम माऊली गावाच्या सीमेतील ११० वर्षे जुना पूल नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या पुलाची वयोमर्यादा १०० वर्षांची असून ती संपल्याने ब्रिटिश काळात हा पूल बांधणार्या आस्थापनाचे पत्र महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेले आहे. सर्वत्र पुलांच्या एवढ्या दुर्घटना होत असूनही संगम माऊली येथील पूल पडण्याची प्रशासनाकडून वाट पाहिली जात आहे का ? असा संतप्त प्रश्न सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांनी उपस्थित केला आहे.
चोरगे म्हणाले, ‘‘या पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ केले आहे. निविदा प्रक्रियाही पूर्ण करून ३-४ वर्षांपूर्वी पूलाच्या बांधकामाला प्रारंभ झाला; मात्र केवळ एकच खांब बांधून झाला आहे. (४ वर्षांत पुलाचा एकच खांब बांधणार्या ठेकेदाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले ? हेही स्पष्ट करायला हवे ! – संपादक) संगम माहुली येथील पुलाचे बांधकाम ठेकेदाराकडून प्रशासनाने लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे काम पूर्ण करून घ्यावे आणि भविष्यातील जीवित अन् वित्त हानी टाळावी.’’
संपादकीय भूमिकाहा प्रश्न का विचारावा लागतो ? प्रशासन स्वत:हून कार्यवाही का करत नाही ? |