
मुंबई – उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात २२ जुलै हा दिवस ‘देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याद्वारे देशी गायीचे दूध, शेण, गोमूत्र आदींपासून उत्पादित वस्तूंनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. देशी गायींच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी पशूसंवर्धन आयुक्त आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांकडून संयुक्तरित्या चर्चासत्रे, प्रदर्शने, शिबिरे, स्पर्धा आदी आयोजित करण्यात येणार आहेत.