
नागपूर – महाराष्ट्रात मोसमी पावसाची स्थिती ही १ ते १४ जूनपर्यंत चांगली नाही; मात्र १५ ते ३० जून या कालावधीत मान्सून सक्रीय होऊन चांगला पाऊस पडणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हवामान वैज्ञानिक अक्षय देवरस यांनी दिली आहे. ते पाऊस आणि हवामान यांच्याविषयी संशोधन करतात.
केरळ किनार्यावर लवकर पोचल्यानंतर गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच नैऋत्य मान्सून अचानक थांबला आहे. २९ मेपासून देशाच्या पश्चिमेकडून येणार्या कोरड्या हवेमुळे संपूर्ण भारतात त्याची वाटचाल थांबली आहे; मात्र विदर्भात १५ जूनच्या आसपास मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. जूनच्या दुसर्या पंधरवड्यात चांगला पाऊस पडेल.