युरोपमधील नोकरीच्या आमीषाद्वारे लाखो रुपयांना फसवणार्‍या २ ख्रिस्ती महिलांना अटक !

ठाणे – युरोपमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून गोव्यातील एका जोडप्याची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाईंदर येथील २ ख्रिस्ती महिलांना अटक पोलिसांनी अटक केली. जोआना रेमेडिओस (वय ३२ वर्षे) आणि पर्पेच्युअल रेमेडिओस (वय ४२ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या समवेत आणखी दोन जणांवर फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप आहे.

आरोपींनी बनावट नोकरीपत्र देऊन पैसे उकळले होते. फसवणूक झाल्याचे कळताच जोडप्याने केलेल्या तक्रारीनंतर वरील कारवाई करण्यात आली. पीडित जोडप्याने आरोपींना एकूण ४ लाख ८० सहस्र रुपये दिले होते.

संपादकीय भूमिका

गुन्हेगार ख्रिस्ती महिलांकडून फसवणुकीची रक्कम सव्याज वसूल करायला हवी !