बार्शी येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

बार्शी (जिल्हा सोलापूर), १२ जून (वार्ता.) – आळंदीजवळील प्रस्तावित पशूवधगृह त्वरित रहित करावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बार्शी येथील तहसीलदार ए.आर्. शेख यांना देण्यात आले. या निवेदनाच्या समवेत कोरफळे, कव्हे आणि गुळपोळी गावातील ५५० लोकांच्या स्वाक्षर्या जोडल्या आहेत. निवेदन देण्यासाठी ह.भ.प. अनंत सातपुते, ह.भ.प. हरिभाऊ माळी, सर्वश्री मारुति ठाकरे, समर्थ सोनार, आप्पा चिकणे यांनी पुढाकार घेतला, तसेच नागरिक, वारकरी यांचे प्रबोधन करून त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या.