Christian Priest Raped Minor Boy : केरळमध्ये पाद्र्याने केला १६ वर्षांच्या मुलावर बलात्कार

  • गुन्हा नोंदवताच पाद्री पसार

  • चर्चकडून पाद्र्याला वाचवण्याचा प्रयत्न

पाद्री फादर पॉल थट्टुपरंबिल

कासारगोड (केरळ) – १६ वर्षांच्या मुलावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अथिरुमावू येथील सेंट पॉल चर्चचे पाद्री फादर पॉल थट्टुपरंबिल यांच्याविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा पाद्री सध्या पसार असून त्याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी चर्चकडून प्रयत्न केला जात आहे.

या पाद्रीने १५ मे २०२४ ते १३ ऑगस्ट २०२४ या काळात ११ वीच्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्या घरी आणि इतर ठिकाणी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे कृत्य उघड झाल्यानंतर चर्चने त्याला वाचवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. चर्चशी संबंधित लोकांनी पॉलवरील आरोप फेटाळले आहेत.

संपादकीय भूमिका

अशा घटनांविषयी निधर्मी आणि पुरो(अधो)गामी काहीच बोलत नाहीत !