Cyber Arrest : कल्याण येथून सायबर आर्थिक फसवणुकीतील आरोपी अटकेत  

केंद्रीय अन्वेषण विभागाची धाड

कल्याण – केंद्रीय अन्वेषण विभागाने देशभरात घातलेल्या धाडीत कल्याण येथून प्रतीक तनपुरे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग आढळला आहे.

सायबर फसवणूक करणार्‍या आरोपींना अवैध सीमकार्ड आणि बनावट कागदपत्रे यांच्या आधारे उघडण्यात आलेले बँक खाते, अशा गोष्टी पुरवत होता, असा आरोप आहे. या बँक खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतील रकमेपैकी काही रक्कम जमा झाली आहे. या धाडीच्या वेळी त्याच्याकडून महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.