CG Liquor Scam Case : छत्तीसगड दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस भवन केले जप्त !

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील २ सहस्र १६१ कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) माजी उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांचे रायपूर येथील घर, सुकमा येथील काँग्रेस भवन आणि त्यांचा मुलगा हरीश कवासी यांचे सुकमा येथील घर जप्त केले. एकूण ६ कोटी १५ लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. हा घोटाळा वर्ष २०१९ ते २०२२ या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात झाला होता. कवासी लखमा आणि त्यांचा मुलगा हरीश या प्रकरणात कारागृहात आहेत. दारू घोटाळ्याशी संबंधित अवैध व्यवहारांच्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले.

दुसरीकडे काँग्रेसचे माध्यम प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी ईडीच्या या कारवाईला ‘राजकीय सूडबुद्धी’ असे संबोधले आहे.

संपादकीय भूमिका

हे काँग्रेसला अत्यंत लज्जास्पद ! आता देशात भ्रष्टाचारी काँग्रेसवर बंदी घालणेच शेष राहिले आहे !