‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला व्हिडिओंच्या माध्यमातून देशभरात मोठी प्रसिद्धी !
फोंडा (गोवा) – ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या आधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदांचे व्हिडिओ, तसेच महोत्सवाच्या वेळी झालेल्या विविध कार्यक्रमांचे ४० हून अधिक व्हिडिओ देशभरातील वृत्तवाहिन्या, यू ट्यूब चॅनल्स आणि केबल वाहिन्या यांना पाठवण्यात आले. त्यांतील ६४ वृत्तवाहिन्यांनी २११ व्हिडिओ प्रसारित केले. या माध्यमांतून साधारण ११ कोटी ११ लाख दर्शकांपर्यंत सनातन राष्ट्राचा संदेश पोचवण्यात यश आले.
२५ वाहिन्यांद्वारे ३ कोटी ५३ लाख दर्शकांपर्यंत थेट प्रक्षेपण !
देशभरातील २५ वृत्तवाहिन्या आणि यू ट्यूब चॅनल्स यांवरून महोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. महोत्सवाच्या कालावधीत ३ कोटी ५३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत हे थेट प्रक्षेपण पोचले.
🚩 Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav draws national attention through extensive video coverage!
📺 211 videos across 64 news channels
🎥3.53 crore viewers reached via live telecast on 25 channels
🎙 17 interviews of Sanatan Sanstha spokespersons cross 74 lakh views
📢 Max… pic.twitter.com/CvkQ9icQVz— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 15, 2025
सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांच्या १७ मुलाखतींना ७४ लाखांहून अधिक प्रेक्षक !
महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १७ वृत्तवाहिन्या, केबल आणि यू ट्यूब चॅनल्स यांवर सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या. या माध्यमांतून ७४ लाख १६ सहस्र प्रेक्षकांपर्यंत सनातन संस्थेचा संदेश पोचवण्यात आला.
दूरदर्शन सह्याद्रीवर ‘आपला महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष प्रसारण !
दूरदर्शन सह्याद्रीवरील ‘आपला महाराष्ट्र’ या कार्यक्रमात महोत्सवाच्या क्षणचित्रांचे ५ मिनिटांचे विशेष प्रसारण २ वेळा करण्यात आले.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा विषय जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी सहकार्य करणार्या सर्व वृत्तवाहिन्या, यू ट्यूब चॅनल्स आणि पत्रकारांप्रती सनातन संस्थेने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला अन्य वर्तमानपत्रे आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्याकडून मिळालेली प्रसिद्धी !
फोंडा (गोवा) – आध्यात्मिक आणि राष्ट्रीय चेतना जागृत करणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’सारखा भव्य महोत्सव गोव्याच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आला. तो यशस्वी करण्यासाठी देश-विदेशातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हा स्तरीय वृत्तपत्रे, वेब पोर्टल्स (वृत्त संकेतस्थळे), वृत्तवाहिन्या, केबल वाहिन्या यांनी मोठा वाटा उचलला आहे. संस्थेच्या वतीने पाठवण्यात आलेली प्रसिद्धीपत्रके, लेख आणि व्हिडिओ यांच्या माध्यमांतून देश-विदेशात सनातन राष्ट्राचा शंखनाद झाला.
१. पत्रकार परिषदा : महोत्सवाचा विषय सर्वत्र पोचण्यासाठी देशभरात १५ पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. याला २०० हून अधिक संपादक आणि पत्रकार उपस्थित होते.
२. संपादक आणि पत्रकार यांना संपर्क : महोत्सवाचा विषय कळावा आणि प्रसिद्धी मिळावी, यासाठी सनातनच्या साधकांनी देशभरात ४५ जिल्ह्यांतील १ सहस्रहून अधिक संपादक आणि पत्रकार यांना भेटून माहिती दिली.
३. प्रसिद्धीपत्रकांना व्यापक प्रसिद्धी : महोत्सवाचा विषय सर्वत्र पोचावा, यासाठी १६० हून अधिक प्रसिद्धीपत्रके प्रसारित करण्यात आली. साधारण १ सहस्र ८०० वृत्ते सर्वत्र प्रकाशित झाली. यामध्ये देशभरातील १ सहस्त्र ८० वृत्तपत्रे, ५५२ वेब पोर्टल आणि १३८ स्थानिक यू ट्यूब चॅनल यांचा समावेश आहे.
४. विशेष लेखांना प्रसिद्धी : महोत्सवाचा विषय सांगणारे ५ लेख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीसाठी देण्यात आले. १३२ वृत्तपत्रे आणि ५५ वेब पोर्टल यांवर हे लेख प्रकाशित झाले. यांसमवेत १२३ लघुलेखही प्रकाशित झाले.
शंखनाद महोत्सवाचे थेट प्रक्षेपण करणारे, संस्थेच्या प्रवक्त्यांची मुलाखत प्रसारित करणारे व महोत्सवाचे सर्व व्हिडिओ प्रसारित करणारे वृत्तवाहिन्या केबल वाहिन्या व यूट्यूब चॅनेल यांची एकत्रित संख्या ७९ आहे.