Israel Iran War : पाकिस्तानकडून इराणला समर्थन : सर्व मुसलमान देशांना एकत्र येण्याचे केले आवाहन

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर पाकने इराणला समर्थन देण्याची घोषणा करत अन्य मुसलमान देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, इराणवर ज्या पद्धतीने आक्रमण झाले, ते चुकीचे आहे. आम्ही इराणसमवेत उभे आहोत. आम्ही या आक्रमणाचा निषेध करतो. गाझावरील आक्रमणाच्या वेळी सर्व मुसलमान देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. जर सर्व मुसलमान देश एकत्र आले नाही, तर पुढे काहीही होऊ शकते. सर्वांचा समान शत्रू असणार्‍या देशाविरुद्ध लढा उभारण्याची वेळ आली आहे. सर्वांचा शत्रू असणारा हा देश इस्रायल आहे. इस्रायलसंदर्भात आताच काही उपाय काढले नाहीत, तर सर्व मुसलमान मारले जातील.

संपादकीय भूमिका

इस्रायलच्या विरोधात सर्व मुसलमान देश एकत्र आले, तरी ते इस्रायलचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत, उलट त्यांना हानीच सोसावी लागणार असल्याने ते इस्रायलच्या वाटेला जाणार नाहीत; मात्र आता पाकने केलेल्या या आवाहनामुळे इस्रायलने पाकला धडा शिकवल्यास आश्चर्य वाटू नये !