
पंढरपूर – आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूर येथे येतात. त्यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ५ सहस्र २०० विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्याहून अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस्.टी. बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत.’’
वारकरी, भाविक, तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पहाता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी ४ तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत.’’