(म्हणे) ‘माझ्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध करा अन्यथा आरोपमुक्त करा !’ – कन्हैय्या कुमार

देशविरोधी घोषणा दिल्यामुळे राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैय्या कुमारची कोल्हापुरात सभा

देशविरोधी घोषणा देणार्‍यांचे उदात्तीकरण केले जाणे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लज्जास्पद !

कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मला देशद्रोही म्हणते. मी जर देशद्रोही असेन, तर मला अद्याप कारागृहात का टाकले नाही ? मला देहली येथे रहायला अनुमती आहे; मग येथे यायला का अधिकार नाही ? मी एकतर देशद्रोही असल्याचे सिद्ध करा अन्यथा मला आरोपमुक्त करा, अशी विधाने देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष, अखिल भारतीय छात्र परिषदेचा वादग्रस्त नेता तथा देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैय्या कुमार यांनी येथे केली.

येथील केशवराव भोसले नाट्यगृहात ‘ऑल इंडिया युथ फेडरेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कन्हैय्या कुमार याने केलेली विधाने

१. केंद्रात, राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप सरकारने एक तरी काम पूर्ण केले आहे का ? नोटाबंदीनंतर अतिरेकी आणि नक्षलवादी आक्रमणे थांबली आहेत का ? महिलांवरील अत्याचार किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या आहेत का ? किती रोजगार वाढले ? किती काळे धन आले ?

२. देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी फसवत आहेत. जनतेला आणखीन फसवायचे बंद करा नाहीतर एक दिवस पळायलाही भूमी मिळणार नाही. मोदी यांनी मोठी स्वप्ने दाखवली आणि केवळ मोठी आश्‍वासने दिली. भाजपची धोरणे देशाच्या एकतेच्या विरोधात आहेत.

३. देशाची एकता भंग करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. या देशात ‘एक राष्ट्र, एक पक्ष आणि एक नेता’ अशी हुकूमशाही प्रवृत्ती रुजवली जात आहे, ती आताच मोडून काढायला हवी. त्यांना या १०० वर्षांच्या आत संविधान आणि देशाचा झेंडा पालटायचा आहे. हे थांबवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. मी निवडणूक लढवणार नाही; मात्र निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही टिकून रहाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.

४. गौरी लंकेश यांनी हिंदूविरोधी लिखाण केले होते, असे म्हटले जाते; मात्र त्या हिंदूंच्या विरोधात नव्हत्या, तर देशातील हिंदु धर्माच्या नावाखाली जे लोक राजकारण करत आहेत, त्याचा विरोध करत होत्या. या देशात सर्वच मुसलमानांना गुन्हेगार ठरवले जात आहे. (सर्वच मुसलमान गुन्हेगार नसतात; मात्र गुन्हेगारी आणि आतंकवादी कारवायांमध्ये  सापडणारे बहुतांश हे मुसलमान का असतात, याचे उत्तर कन्हैय्या कुमार देणार का ? देशातील काश्मीरसह अनेक राज्यांतील हिंदूंच्या क्रूरपणे हत्या करणारे जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांच्या विरोधात कन्हैय्या कुमार एक शब्दही काढत नाही; मात्र त्यांची पाठराखण करत आहे. त्यामुळे कन्हैय्या कुमारसारख्यांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – संपादक)  राममंदिराच्या नावाखाली नथुरामच्या मंदिराचा जो कट रचला जात आहे तो बंद करा. (राममंदिराच्या नावाखाली धर्मांध आणि आतंकवादी कट रचून देशात दंगली घडवत आहेत. असे असतांना देशभक्त नथुराम गोडसे यांचा संबंध राममंदिराशी जोडून कन्हैय्या कुमार देशातील पुरो(अधो)गामी, कम्युनिस्ट आणि मुसलमान यांना खूश करत आहे. कन्हैय्या कुमार याने नथुराम गोडसे यांची देशभक्तीही जाणून घ्यावी ! – संपादक) 

५. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो, असे सांगणारा हा भाजप आता भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात सहभागी करून घेत आहे. (काँग्रेस पक्षानेही असाच कित्ता गिरवला होता, त्या वेळी कन्हैय्या कुमार यांचे तोंड का बंद होते ? केवळ भाजपसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या द्वेषापोटी अशी विधाने करून कन्हैया कुमार स्वतःची प्रसिद्धी करवून घेत आहेत, हेच यातून उघड होते ! – संपादक) 

कन्हैय्या कुमार यांची हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टीका !

‘मी जिकडे जाईन तिकडे विहिंप, बजरंग दल, रा.स्व. संघ, सनातन संस्था या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जाणीवपूर्वक विरोध करण्यात येत आहे. भगवा रंग हा संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय यांचा असून विचारवंतांना गोळ्या घालून पळून जाणार्‍यांचा नाही’, असे कन्हैय्या कुमार याने आपल्या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सांगितले. (साम्यवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍याने हिंदुत्वनिष्ठांना भगवा रंग शिकवू नये ! विचारवंतांना गोळ्या घालणारे भगव्या रंगाशी निगडित असल्याचे कुठल्याही न्यायालयात सिद्ध झालेले नाही. असे असूनही अशी विधाने करणारा कन्हैय्या कुमार स्वत:ला न्यायालयाहून श्रेष्ठ समजतो का ? – संपादक)

(म्हणे) ‘देश महासत्ता करणार्‍यांना डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हत्या प्रकरणांतील मारेकरी सापडत नाहीत !’ – कन्हैय्या कुमार

मारेकरी न सापडण्यामागे पुरोगाम्यांनी पोलिसांची केलेली दिशाभूलच कारणीभूत आहे, हे उघड सत्य !

कन्हैय्या कुमार याने कॉ. पानसरे यांची हत्या झालेल्या ठिकाणास भेट दिली. त्यानंतर कॉ. पानसरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधतांना कन्हैया कुमार म्हणाला, ‘‘अलीकडच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, तसेच ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश अशा ४ जणांची हत्या झाली आहे. देश महासत्ता बनवण्याची भाषा बोलणार्‍यांना या पुरोगाम्यांच्या हत्या करणार्‍या एकाही खुन्याला पकडता येत नाही हे कशाचे लक्षण आहे ? शिवाय माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या मुर्खांना कळत नाही की, जितका आवाज दाबला जाईल, तितक्याच तीव्रतेने तो पुन्हा उभारणार आहे.’’ (देशद्रोह्यांचा आवाज कितीही तीव्र झाला, तरी १२५ कोटी राष्ट्रप्रेमींच्या आवाजासमोर तो तोकडाच पडणार आहे ! – संपादक)