वर्ष २०१२ मध्ये नांदेड येथून अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांनी त्यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे स्वीकारले

गेली ५ वर्षे आतंकवाद्यांना शिक्षा न होणे, हे देशातील आतंकवाद नष्ट न होण्यामागील एक कारण होय ! आतंकवाद्यांना तात्काळ कठोर शिक्षा होऊ लागल्यास त्यांच्यावर काही प्रमाणात तरी वचक बसेल !

मुंबई – वर्ष २०१२ मध्ये आतंकवादविरोधी पथकाने नांदेड येथून ५ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यांनी पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी त्यांचा संबंध असल्याचे स्वीकारले आहे. त्यांनी मुंबईतील राष्ट्रीय अन्वेेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयामध्ये लेखी स्वरूपात ही गोष्ट मान्य केली आहे. या आतंकवाद्यांनी सौदी अरेबियातील त्यांच्या प्रमुखांच्या आदेशाने हिंदूंचे नेते आणि काही पत्रकार यांच्या हत्या करण्याचा कट रचला होता. त्यांच्याकडून काही शस्त्रेही जप्त करण्यात आली होती. महंमद मुजम्मिल, महंमद सादिक, महंमद इलियास, महंमद इरफान आणि महंमद अशी त्यांची नावे आहेत. ते गेली ५ वर्षे कारागृहात आहेत आणि त्यांना ज्या गुन्ह्यात अटक केली आहे, त्यानुसार त्यांना मिळणार्‍या शिक्षेचा कालावधी इतकाच असू शकतो. त्यामुळे त्यांनी त्यांचा गुन्हा स्वीकारला आहे.