मॉरिशसमध्ये आतंकवाद्यांकडून कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त !

‘हिंदु युथ काऊन्सिल’कडून निषेध

भारतातील मंदिरांचे रक्षण करू न शकणारे सरकार विदेशातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कसे करणार ? सर्वत्रच्या मंदिरांचे रक्षण होणे यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पोर्ट लुई (मॉरिशस) – मॉरिशसमध्ये काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. या आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ‘हिंदु युथ काऊन्सिल’ने या आक्रमणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. प्रसारमाध्यमांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी ‘हिंदु युथ काऊन्सिल’ने केली आहे. या आतंकवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मॉरिशसमधील हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘हिंदु युथ काऊन्सिल’ने केले आहे.

१. डोंगराळ प्रदेशातील एक मंदिर गॅस सिलिंडरच्या स्फोटाद्वारे उडवण्याचा प्रयत्न आतंकवाद्यांनी केला होता; परंतु ईश्‍वरी कृपेमुळे त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. आतंकवाद्यांनी योजनाबद्धरित्या हे आक्रमण घडवून आणल्याचे उघड झाले आहे.

२. मॉरिशसमध्ये फार पूर्वीपासून हिंदु समुदायाला आतंकवादी आक्रमणांना सामोरे जावे लागत आहे. तेथे नेहमीच आतंकवादी आक्रमणाची शक्यता कायम असते. तेथे अनुमाने ५-६ सहस्र आतंकवादी कार्यरत आहेत, अशी माहिती मॉरिशसच्या अन्वेषण विभागाने दिली आहे.