श्रीलंकेत मंदिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना !

भारताच्या शेजारील अन्य धर्मियांच्या देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा सातत्याने छळ होत आहे; मात्र हिंदूबहुल भारताकडून कधीही त्यांच्यावरील अन्यायाचा विरोध करण्यात आलेला नाही किंवा हिंदूंच्या संघटनांकडून हवा तसा दबाव निर्माण झालेला नाही, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !

तोडफोड करण्यात आलेले श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिर आणि उखडून बाहेर फेकलेल्या मूर्ती (वर्तुळात दाखवले आहे.)

कोलंबो – श्रीलंकेतील हिंदूबहुल निलाथारी विभागात असलेल्या मुथालीयारकुलम् या गावातील श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिराची २ नोव्हेंबरच्या पहाटे तोडफोड करून तेथील मूर्ती उखडून बाहेर फेकल्याचे लक्षात आले आहे.

मुथालीयारकुलम् या गावात हिंदूंची ३३० कुटुंबे असून त्यात १ सहस्र १५६ हिंदू रहातात. या व्यतिरिक्त १२१ घरांत ४६५ ख्रिस्ती आणि २८ घरांत ९२ मुसलमान वस्ती करून आहेत. ख्रिस्ती आणि मुसलमान हे हिंदूंना नेहमी त्रास देतात. या गावात हिंदूंची अनेक मंदिरे आहेत. त्यातील एक श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिर आहे. या गावात धर्मांतराची अनेक प्रकरणे झाली आहेत. त्यातील सर्व प्रकरणांत हिंदूंचेच धर्मांतर झाले आहे. तसेच एक लव्ह जिहादचे प्रकरणही झाले आहे. त्यामुळे या कृत्यामागे ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्मियांचाच हात असावा, अशी हिंदूंना शंका आहे.

श्रीलंका हा बौद्धबहुल देश आहे. तेथील घटनेप्रमाणे बौद्ध धर्माला अग्रस्थान देण्यात आले असले, तरी इतर धर्मियांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तरीही हिंदूंनाच बौद्ध धर्मियांच्या रोषास नेहमी बळी पडावे लागते.

हे चित्र कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने प्रसिद्ध केलेले नाही – संपादक


Multi Language |Offline reading | PDF