Aamir Hamza Injured : हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा घायाळ !

आमिर हमजा

इस्लामाबाद – ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेचा सह-संस्थापक हाफिज सईद याचा जवळचा सहकारी आमिर हमजा याला अचानक रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तो शेवटची घटका मोजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिर हमजा त्याच्या घरी झालेल्या गोळीबारात गंभीररित्या घायाळ झाला होता. काही दिवसांपूर्वी ‘लष्कर-ए-तोयबा’चा आतंकवादी अबू सैफुल्ला याची पाकिस्तानात अज्ञात बंदूकधार्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवासी असलेल्या आमिर हमजाला वर्ष २०१२ मध्ये अमेरिकेने जागतिक आतंकवादी घोषित केले होते. आमिर हमजा हाफिज सईद आणि अब्दुल रहमान यांचा जवळचा मानला जातो. वर्ष २००५ मध्ये बेंगळुरूमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’वर झालेल्या आक्रमणामागे हमजाचा हात होता.