Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमधील चकमकीत २७ नक्षलवादी ठार

दीड कोटी रुपयांचे बक्षीस असणारा नक्षलवादी बसवा राजू ठार

जगदलपूर (छत्तीसगड) – येथील अबुझमाड जंगलात २१ मेच्या सकाळी सुरक्षादलांनी २७ नक्षलवाद्यांना ठार मारले. यांतील २० जणांचे मृतदेह आणि शस्त्रे सापडली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये बसवा राजू या प्रमुख नक्षलवाद्याचाही समावेश आहे. त्याची माहिती देणार्‍याला दीड कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक चालू होती.

पोलिसांनी ७ दिवसांपूर्वी ‘करेगुट्टा ऑपरेशन’ची माहिती दिली होती. या अंतर्गत छत्तीसगड-तेलंगाणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांमध्ये २४ दिवस चाललेल्या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. यामध्ये १६ महिला आणि १५ पुरुष नक्षलवादी आहेत.