
पुणे – शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख नीलेश घारे यांचे गणपति माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. १९ मे या दिवशी मध्यरात्री कार्यालयासमोर उभ्या असलेल्या घारे यांच्या चारचाकीवर दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञातांनी गोळीबार केला. या वेळी गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. नीलेश घारे यांच्यावर गोळीबार करणारे कोण होते ? त्यांच्यावर गोळीबार करायला कुणी लावला होता का ? याचे पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका :पुणे शहरात सातत्याने वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर पुणे पोलीस कधी उपाययोजना काढणार ? |