
मुंबई – पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांना हुतात्मा (शहीद) घोषित करण्याची मागणी काही याचिकाकर्त्यांनी केली होती; परंतु पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की, कार्यकारी मंडळासाठी राखीव असलेल्या धोरणनिर्मितीत न्यायालय हस्तक्षेप करत नाही. याचिकाकर्त्याने संबंधित निवेदन योग्य अधिकार्यासमोर ३० दिवसांच्या आत सादर करावे.