|

मुंबई – दहिसर येथील गणपत पाटील झोपडपट्टीतील हमीद शेख आणि राम नवल गुप्ता यांच्या कुटुंबांनी एकमेकांवर केलेल्या आक्रमणात राम नवल गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता आणि हमीद शेख यांचा मृत्यू झाला, तर चार जण घायाळ झाले. या आक्रमणाच्या वेळी चाकू आणि कोयता या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. आक्रमणात राम नवल यांचे दोन मुलगे आणि हमीद शेख यांचे दोन मुलगे गंभीर घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबांत वर्ष २०२२ पासून वाद होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. हमीद शेख याने मद्यपान करून राम नवल गुप्ता यांच्या नारळाच्या दुकानाच्या ठिकाणी जाऊन वाद घातला. या वेळी दोघांनीही त्यांच्या मुलांना बोलावले. त्या वेळी झालेल्या प्राणघातक आक्रमणात वरील स्वरूपाची घटना घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका
|