
चंडीगड (हरियाणा) – पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून हरियाणातील ज्योती मल्होत्रा हिला नुकतीच अटक करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत ११ जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हरियाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेश या राज्यांत हे अटकसत्र चालू करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्योती मल्होत्रा, दानिश, देवेंद्र सिंह, अरमान, गजाला, नौमान इलाही, महंमद मुर्तजा अली, शहजाद, यामीन, सुखप्रीत सिंह आणि करनबीर सिंह यांचा समावेश आहे.