मुंबईत कोरोनाचे ५३ सक्रीय रुग्ण !

  • महाराष्ट्रात कोरोनाचे २५७ रुग्ण

  • दक्षता म्हणून १०० हून अधिक बेड राखीव

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचे २५७ रुग्ण, तर मुंबईत ५३ रुग्ण आढळले आहेत. या ५३ पैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. अर्थात् त्यातील एकाला कर्करोग, तर दुसर्‍याला ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’ (मूत्रपिंडाशी संबंधित आजार) होते. हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन आशियाई देशांमध्येही कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सध्या साथीच्या रोगांची स्थिती असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मान्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून १०० हून अधिक बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.