वक्फ कायद्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
नवी देहली – संसदेने संमत केलेले कायदे घटनात्मक असतात. जोपर्यंत ‘कायदा घटनात्मक नाही’, हे सिद्ध करणारे ठोस सूत्र उपलब्ध नाही, तोपर्यंत न्यायालये अशा कायद्यांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणार्या अनेक याचिकांवर सुनावणी करतांना हस्तक्षेप न करण्यावर न्यायालयाची भूमिका स्पष्ट केली. या वेळी याचिकाकर्त्यांकडून बाजू मांडणारे अधिवक्ता कपिल सिब्बल म्हणाले की, ‘या कायद्याद्वारे सरकार वक्फ मालमत्ता कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.’ यावर सरन्यायाधीश भूषण गवई आणि अन्य २ न्यायाधिशांच्या खंडपिठाने म्हटले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये वक्फ मालमत्तेविषयी अनेक वाद आहेत.