रत्नागिरी – जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून जोरदार वादळी वार्यासह पावसाळी वातावरणामुळे अनकांची धावपळ उडाली आहे. विशेषतः दापोली आणि राजापूर येथे अधिक पाऊस पडला आहे. २० मे या दिवशी साधारण ३.३० च्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वार्यासह पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे सर्व सामान्य जनतेसह मासेमारांचीही एकच धावपळ उडाली. बंदरातील उभ्या केल्या जाणार्या नौकांनी लागोलाग किनार्यावर घ्यायला सुरुवात केली.