
पुणे – इंडियन एअरफोर्सचा अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक करणार्या गौरव कुमार या व्यक्तीला अन्वेषण यंत्रणांनी अटक केली आहे. गुप्तचर यंत्रणेला त्याच्या संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली होती. दक्षिणी कमांडचा मिलिटरी इंटेलिजन्स विभाग आणि खराडी पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून एअरफोर्सचे टी शर्ट, कॉम्बॅट पॅन्ट, शूज, बॅजेस आदी वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपी उत्तरप्रदेशाचा आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.