रत्नागिरीत धर्मांधांकडून रस्त्यावर साजरा केला जात होता वाढदिवस !

रत्नागिरी – शहरातील आझादनगर येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्या धर्मांधांना विचारणा करणार्या मोहंमद शेख समीर काझी (वय २५ वर्षे) याच्या छातीवर चाकूने वार करून त्याला घायाळ करण्यात आले, तसेच त्याच्या नातेवाइकांनाही जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १६ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
संशयित आरोपी हे आझादनगर बसस्टॉप येथे रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अफताब बलबले याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. या ठिकाणी वाढदिवस साजरा केला.