विचारणा करणार्‍या मुसलमान तरुणावर चाकूने वार : १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

रत्नागिरीत धर्मांधांकडून रस्त्यावर साजरा केला जात होता वाढदिवस !

प्रतिकात्मक चित्र

रत्नागिरी – शहरातील आझादनगर येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्‍या धर्मांधांना विचारणा करणार्‍या मोहंमद शेख समीर काझी (वय २५ वर्षे) याच्या छातीवर चाकूने वार करून त्याला घायाळ करण्यात आले, तसेच त्याच्या नातेवाइकांनाही जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १६ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

संशयित आरोपी हे आझादनगर बसस्टॉप येथे रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अफताब बलबले याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतांना मोहंमद काझी त्या ठिकाणी आला आणि त्याने संशयितांना ‘तुमचे या ठिकाणी काय चालले आहे’, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने संशयित आरोपींनी ‘रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का ?’, असे विचारत रागाने संतप्त झालेल्या आफताब याने तक्रारदार याच्याकडे बोट दाखवत ‘यानेच माझ्या काकाला अडकवले आहे, याला सोडू नका’ असे सांगितले. त्यानंतर केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने मोहंमद काझी याच्या छातीवर वार केले. त्याचसमवेत अन्य संशयित आरोपींनी काझी याच्या डोक्यात लोखंडी सळी मारून दुखापत केली, तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.


मोहंमदचे नातेवाईक त्याला सोडवण्यासाठी आले असता संशयितांनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांत प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचा धर्मांधांचा नवीन जिहाद लक्षात घ्या ! आतापर्यंत रस्त्यावर नमाजपठण करणे, गड-दुर्गांवर थडगे उभारून गड जिहाद करणे किंवा दंगल करून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे आदींविरोधात कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम ! पोलीस आतातरी यांच्यावर कठोर कारवाई करतील का ?