पालघर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात २० मे या दिवशी सकाळी बाँब असल्याचा ई-मेल प्राप्त झाला. अज्ञाताने हा बाँब दुपारी ४.३० वाजता फुटणार असल्याची धमकी दिली होती. या प्रकरणी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून मुख्यालय परिसरातील सर्व इमारती रिकाम्या केल्या आहेत. पोलीस बाँबविरोधी पथक आणि एन्.डी.आर्.एफ्. यांनी इमारतीचे नियंत्रण घेतले असून बाँब शोधण्याचा प्रयत्न चालू होता.
संपादकीय भूमिकाकुणीही उठतो आणि बाँब ठेवल्याची धमकी देतो, याचा अर्थ राज्यात कायदा-सुव्यवस्थाच राहिलेली नाही, असे म्हणायचे का ? |