मुंबईत विधानभवन परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग ! 

मुंबई – येथील विधानभवन परिसरात अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट येत असल्याने विधानभवन परिसरात गोंधळ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पहाणी केली. ‘फायर एक्स्टिंग्विशरच्या साहाय्याने आग विझवण्यात आली. विधानभवनाच्या स्वागतकक्षाकडील भागात असणार्‍या स्कॅनिंग यंत्रात शॉर्टसर्किट झाल्याने छोट्या प्रमाणात आग लागली. या दुर्घटनेत सर्व कर्मचारी सुरक्षित असून कर्मचारी लगेचच बाहेर आले होते. त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. काही काळाने परिस्थिती नियंत्रणात आली असून कुठलीही हानी झाली नाही.